सावली : आज पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एकाचा बळी

1068

– कापूस काढतांना वाघाचा हल्ला
The गडविश्व
ता.प्र / सावली , १५ डिसेंबर : तालुक्यातील रुद्रापूर येथे काल बुधवारी एका शेतकऱ्यांचा वाघाने बळी घेतल्याची घटना ताजी असतांनाच आज गुरुवार १५ डिसेंबर ला पुन्हा सावली पासून ३ किमी अंतरावरील खेडी येथे शेतात कापूस काढत असताना वाघाने हल्ला करून स्वरूपा प्रशांत येलेटीवार (५०) ह्या महिलेस ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सदर घटनेची माहिती वनविभाग सावली ला देण्यात आली असून घटनास्थळी वनविभाग व पोलीस ची चमू पोहचली आहे. या घटनेने परिसरातील शेतकरी चांगलेच भयभीत झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here