अतिदुर्गम गावात पेटली दारूमुक्तीची मशाल 

142

– मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 
The गडविश्व
गडचिरोली, ११ फेब्रुवारी : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम अशा येटावाही गावामध्ये गाव संघटना व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, दारूमुक्तीची मशाल पेटवून गावातील ५७ जणांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य थीम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. या उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत युवक, युवती, महिला व पुरुष अशा एकूण ५७ स्पर्धकांनी मुक्तीपथ मॅरेथॉन दौड स्पर्धेत सहभाग दर्शविला. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून स्पर्धेची सुरवात करण्यात आली. ही स्पर्धा महिला,  युवक ,युवती अशा गटात घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये . विविध गटातील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांनतर बैठकीचे आयोजन करून गावातील लोकांना दारू व तंबाखूचे दुष्परिणाम पटवून देत व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन तालुका संघटक किशोर मलेवार व मुक्तिपथ तालुका टीमने केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Dhanora) (The GDV)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here