माध्यमिक/उच्च माध्यमिक शालांत परिक्षेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण सवलत प्रस्ताव सादर करा

107

The गडविश्व
गडचिरोली, दि.१७ : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या जिल्हा/विभाग/राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या/सहभागी झालेल्या खेळाडु विद्याथ्यर्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात २० डिसेंबर २०१८ रोजीचे शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे. या शासन निर्णयामधील परिशिष्ट क्र. ६ व ७ मध्ये सुधारणा करण्यात आली असुन याबाबत दिनांक २५ जानेवारी २०१९ चे शासन शुध्दीपत्रक काढण्यात आले आहे.
सदर शासन निर्णयानुसार सन २०२३-२४ या शैक्षणीक वर्षात ईयत्ता १० वी व ईयत्ता १२ वी मधील खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळणेसाठीचे प्रस्ताव शालेयस्तरावरून मागविण्यात येत आहे. यामध्ये शासन निर्णयात नमुद असलेल्या ४९ खेळप्रकारांना क्रीडा गुण सवलत देण्यात येईल. क्रीडा स्पर्धेमध्ये काही खेळप्रकारात प्रथम पाच क्रमांकापर्यंत प्राविण्य असलेल्या खेळाडूंना प्राविण्य प्रमाणपत्र दिले जात असले तरीही, सुधारीत शासन निर्णयामध्ये फक्त प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या खेळाडू विद्यार्थ्यास क्रीडा गुण सवलत देण्यात येईल. इयत्ता १० वीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यास ईयत्ता ६ वी ते १० वीमध्ये शिकत असताना जिल्हा / विभागस्तरीय स्पर्धेत प्राविण्य व राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्राविण्य / सहभागी झालेल्या उच्चतम स्तराच्या स्पर्धेचा लाभ क्रीडा गुण सवलत करीता घेता येईल तसेच इयत्ता १२ वीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यास ईयत्ता ६ वी ते १२ वीमध्ये शिकत असताना जिल्हा / विभागस्तरीय स्पर्धेत प्राविण्य व राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्राविण्य / सहभागी झालेल्या उच्चतम स्तराच्या स्पर्धेचा लाभ क्रीडा गुण सवलतकरीता घेता येईल. ईयत्ता १२ वी मध्ये असलेल्या खेळाडूने इयत्ता १० वी ची गुणपत्रीका प्रस्तावा सोबत जोडणे बंधनकारक आहे. तसेच एखाद्या खेळाडू विद्यार्थ्याने इ. ६ वी ते १० वी या कालावधीत प्राविण्य मिळविलेले असेल वयाकरीता असलेले सवलतीचे गुणांचा लाभ एकदा घेतला असेल तर त्याला पुन्हा ईयत्ता १२ वी करीता सवलतीचे गुणांचा लाभ घेता येणार नाही. तसेच विद्यमान सत्रात तो खेळाडू संबंधित खेळाच्या स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे.
शासन निर्णयातील सर्व निकषानुसार पात्र असलेले प्रस्ताव शाळा/ महाविद्यालयांनी, शालेय स्पर्धेतील खेळाडूंकरीता विहित नमुना अर्ज, आडवा चार्ट परिशिष्ट-ई, प्रत्येक खेळाडूंचे स्वतंत्र हॉल तिकीट/परीक्षा बैठक क्रमांक, खेळाचे प्रमाणपत्र, हजेरीपट, आधारकार्ड ची सत्यप्रत व चलानइत्यादीसह मुख्याध्यापकाचे स्वाक्षरी व शिक्कासह व्दिप्रतीत सादर करावे. तसेच एकविध क्रीडा संघटना मार्फत खेळाडू असल्यास विहीत नमुना अर्ज, आडवा चार्ट परिशिष्ठ ई व परिशिष्ठ १० संघटना, प्रत्येक खेळाडूंचे स्वतंत्र हॉल तिकीट / परीक्षा बैठक क्रमांक, मान्यता प्राप्त खेळाचे प्रमाणपत्र मुख्याध्यापकाचे स्वाक्षरी व शिक्कासह इत्यादीसह सबंधीत शाळा/ महाविद्यालयांनी खेळाडूचे परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करावे. शासन निर्णय दि. २० डिसेंबर २०१८ अन्वये परिशिष्ठ क्र.१० अन्वये वैयक्तीक व सांघिक खेळाडूंची माहिती जिल्हा / राज्य संघटनेमार्फत सादर करणे आवश्यक आहे. तसेच एकविध खेळाच्या अधिकृत संघटनांनी शासन निर्णयातील परिशिष्ट ४ व ५ नुसार जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर क्रीडा स्पर्धेचा संपूर्ण विस्तृत अहवाल या कार्यालयास सादर करावा. संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी खेळाडूंचे परिपुर्ण प्रस्ताव व्दिप्रतीत विहीत नमुण्यात दिनांक २० एप्रिल २०२४ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दिलेल्या कालावधीत सादर करावे. विहित वेळेत प्रस्ताव प्राप्त न झाल्यास उशीरा आलेल्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी सबंधीत शाळेचे मुख्याध्यापक यांची राहील असे भास्कर घटाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली हे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here