बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची तालुका निहाय नोंदणी होणार

1561

The गडविश्व
गडचिरोली,दि. १७ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत २१ उद्योगातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यात येते. तसेच नोंदणीकृत जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारास मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
२३.०७.२०२० पासून नोदंणी, नुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे कामकाज ऑनलाईन प्रणालीद्वारे मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. परंतु दिवसेंदिवस जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये नोंदणी, नुतणीकरण तसेच लाभाचे अर्ज ऑनलाईन भरण्याकरीता खुप जास्त प्रमाणात कामगारांची गर्दी कार्यालयात होत आहे. तरी होणारी गर्दी नियंत्रीत राहावी तसेच कार्यालयीन कामकाज योग्यनिशी करण्याकरीता पाच दिवसातील आठवडयात तालुका निहाय कामकाज करण्यात येणार आहे. त्या अनुषगाने खालील प्रमाणे वेळापत्रकानुसार नोंदणी, नुतणीकरण तसेच लाभाचे अर्जाचे कामकाज करण्यात येणार आहे.

सोमवार : चामोर्शी, भामरागड
मंगळवार : धानोरा, कुरखेडा, अहेरी
बुधवार : सिरोंचा, कोरची, आरमोरी
गुरूवार : गडचिरोली, एटापल्ली
शुक्रवार : वडसा, मुलचेरा

तरी २०.०२.२०२४ पासून वरीलप्रमाणे आठवड्यातत ठरवून दिलेल्या तालुक्यातील कामगाराचे कामकाज करण्यात येईल यांची बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन उपजिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

विशेष सुचना mahabocw.in या संकेतस्थळावरून आपण कोणतेही दिवशी आपल्या नजिकच्या सेतुकेंद्रामधुन ऑनलाईन अर्ज सादर करता येईल यांची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी. असे उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here