कोरची आश्रम शाळेची दहावीत दमदार कामगिरी ; 84.09 टक्के निकालाने यशाची परंपरा कायम
The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि. ०८ : येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेने इयत्ता दहावी परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल 84.09 टक्के लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरचीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या एसएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
शाळेची विद्यार्थिनी मिनाक्षी खोबा हिने 73.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर दक्ष उसेंडी याने 70.80 टक्के गुणांसह द्वितीय आणि पुष्पा मडावी हिने 70 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
याशिवाय वंदना बागडेकरिया हिला 69.20 टक्के आणि आशिष निर्मलकर याला 68.20 टक्के गुण मिळाले आहेत.
शाळेचा एकूण निकाल 84.09 टक्के लागल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारीवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.














