आरमोरी शहरासह ग्रामीण भागातील अवैध दारूविक्री बंद करा

77

-मुक्तीपथ शहर संघटनेची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, १५ मार्च : आरमोरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु असलेली अवैध दारूविक्री तत्काळ बंद करण्याची मागणी मुक्तिपथ शहर संघटनेच्या वतीने पोलिस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
आरमोरी शहरामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांवर होत असलेले अन्याय, अत्याचार मानसिक छळ व दारूचे-तंबाखूचे दुष्परिणाम, आजची महिला व कालची महिला यावर समायोजित मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर संघटन अध्यक्ष शालिनी चने व शहर संघटन सचिव चंदा राऊत व देसाईगंजचे तालुका संघटिका भारती उपाध्याय, आरमोरीचे तालुका संघटक विनोद कोहपरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलिस निरीक्षक मनोज काळबांधे यांना निवेदन सादर करून शहरातील व ग्रामीण भागातील अवैध्यरित्या सुरू असलेले दारू बंद करावी व दारू विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी आरमोरी शहर संघटनेच्या वतीने करण्यात आली. सोबतच दारू विक्रेत्यांवर कार्यवाही न केल्यास आम्ही आंदोलन करू असाही ईशारा देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर संघटनेच्या शालू मेश्राम, कांबळे, बांगरे यांच्यासह सदस्यांनी सहकार्य केले. संचालन सुषमा वासनिक तर आभार पल्लवी मेश्राम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here