एटापल्ली येथे आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
-समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्था व श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळाचा पुढाकार
The गडविश्व
एटापल्ली, दि. ३० : स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानांतर्गत एटापल्ली येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य वर्धिनी केंद्र, समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्था व श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्र. १० मधील गायत्री शारदा उत्सव मंडळाच्या मंडपात हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
शिबिराचे उद्घाटन प्रभागातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती सुनंदा नामेवार यांच्या हस्ते झाले. या उपक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी भूषण चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिबिरात ४० नागरिकांनी तपासण्या करून घेतल्या. मधुमेह, रक्तदाब, सीबीसी, थायरॉईड प्रोफाईल, सिकल सेल, मलेरिया रॅपिड टेस्ट, डेंग्यू, कोलेस्टेरॉल व लिपिड प्रोफाईल, यकृत कार्य (LFT) आणि मूत्रपिंड कार्य (KFT) अशा महत्त्वपूर्ण चाचण्या करण्यात आल्या.
या वेळी डॉ. गायत्री शहारे (आरोग्य वर्धिनी केंद्र), नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती नामदेव हिचामी, समर्पण संस्थेचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, उपाध्यक्ष राहुल कुळमेथे, सचिव अमोल गजाडीवार, कोषाध्यक्ष सुरज मंडल, सदस्य संतोष गंदेशिरवार, रोहित बोमकंटीवार, अंकित दिकोंडावार, तसेच गायत्री शारदा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळाचे पंकज पत्तीवार, सुमित नाडमवार, अनिकेत मामीडवार, शशांक नामेवार आणि आरोग्य वर्धिनी केंद्राचे कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
या आरोग्य शिबिरामुळे नागरिकांना आवश्यक त्या तपासण्या गावातच सुलभपणे उपलब्ध झाल्या. उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून “अशा आरोग्य शिबिरांची सातत्याने गरज आहे” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews














