एटापल्लीमध्ये स्वच्छतेचा सामूहिक संकल्प : महाविद्यालय, संस्था व गणेश मंडळाचा उपक्रम
The गडविश्व
एटापल्ली, दि. ०२ : “स्वच्छता ही सेवा” या राष्ट्रीय अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एटापल्ली येथे “एक दिवस – एक तास – एकसाथ” या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. को-ऑपरेटिव्ह बँक परिसरात पार पडलेल्या या उपक्रमात महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि गणेश मंडळाचा सक्रिय सहभाग दिसून आला.
ही मोहीम भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग, समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली.
मोहिमेत डॉ. श्रुती गुब्बावार, प्रा. चिन्ना पुंगाटी, डॉ. बाळकृष्ण कोंगरे यांच्यासह समर्पण संस्थेचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, उपाध्यक्ष राहुल कुळमेथे, सचिव अमोल गजाडीवार, सदस्य संतोष गंदेशिरवार व अंकित दिकोंडावार, तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.
स्वयंसेवकांनी परिसरातील कचरा व घाण साफ करून स्वच्छता साधली. या मोहिमेतून नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व, सामूहिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश पोहोचविण्यात आला.
उपक्रमामुळे परिसर सुशोभित झाला तसेच “माझा परिसर – माझी जबाबदारी” ही भावना अधिक दृढ झाली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














