नवनियुक्त पालकमंत्र्याच्या अंगावर शाईफेक

136

– शासकीय विश्रामगृहात घडला प्रकार
The गडविश्व
सोलापूर, १५ ऑक्टोबर : जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रथमच रविवारी रात्री सोलापुरात आले असता शासकीय विश्रामगृहात त्यांच्या अंगावर निळी शाई फेकण्यात आल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेमुळे तेथे एकचं गोंधळ उडाला. दरम्यान पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहात शासकीय नोकरभरतीचे खासगीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ पाटील यांच्या अंगावर निळी शाई फेकल्याची माहिती समोर आली. पाटील यांचे विश्रामगृहात आगमन झाले तेव्हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान
अजय मैंदर्गीकर नावाच्या तरूणाने पोलिस सुरक्षा पार करून पालकमंत्र्यांना भेटताना त्यांच्या अंगावर शाईफेक केली. काळा झेंडा दाखवत, भारतीय जनता पार्टी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि लगेचच शाईफेक केली. त्यामुळे गोंधळ झाल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here