उद्या ‘सर्च’ रुग्णालयात ‘सिकलसेल ओपीडी’

164

The गडविश्व
गडचिरोली, १३ जून : धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात आय.सी.एम.आर सिकलसेल टीम चंद्रपुर व सर्च यांच्या सहकार्याने सर्च रुग्णालय चातगाव येथे सिकलसेल ओपीडीचे नियोजन करण्यात आले आहे. या महिन्याला बुधवार १४ जून २०२३ रोजी सर्च रुग्णालयात ओपीडी घेण्यात येणार असून, डॉ. कल्पिता गावित व त्यांची टीम या ओपीडीसाठी उपस्थित राहणार आहे.
१२ जुलै २०२३, १६ ऑगस्ट २०२३, १३ सप्टेंबर २०२३, १८ ऑक्टोबर २०२३, १५ नोव्हेंबर २०२३ आणि १३ डिसेंबर २०२३ या तारखेला पुढील वर्षात सिकलसेल ओपीडीचे नियोजन केले आहे.
सिकलसेल आजार हा अंनुवांशिक आजार आहे. यात आई व वडील दोघेही सिकलसेल रुग्ण किवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्याना हा आजार होऊ शकतो. आजाराची माहिती, लक्षणे व रुग्णांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन तसेच सिकलसेल आजारा संबंधित होणार्‍या प्रयोगशाळा तपासणी व औषधोपचार मोफत होतील. Folic acid, Hydroxyurea आणि इतर आवश्यक औषधी मोफत दिल्या जाईल.
काळाची गरज समजून चातगाव येथील ‘सर्च’ रुग्णालयात सिकलसेल ओपीडी ला सुरुवात करण्यात आली आहे. बुधवार १४ जून २०२३ या दिवशी ‘सर्च’ मध्ये सिकलसेल ओपीडी घेण्यात येणार असून सिकलसेल आजाराने त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा असे आवाहन ‘सर्च ‘कडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here