सरपंच – उपसरपंचाला नक्षल्यांची बॅनरच्या माध्यमातून धमकी

2495

– खाण आणि धरणाला पाठींबा दर्शविल्याचा केला आरोप
The गडविश्व
बस्तर, १३ जून : नारायणपूर जिल्हयातील नक्षलग्रस्त बासमेटा गावच्या सरपंच आणि उपसरपंचाला नक्षल्यांनी बॅनर लावून हात पाय कापून टाकण्याची धमकी दिली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. नक्षल्यांनी परिसरात मोठया प्रमाणात बॅनर व पोस्टर चिपकवून धमकी दिल्याचे कळते. सध्या पोलीसांनी बॅनर व पोस्टर जप्त केले आहे.
नक्षल्यांनी गावडीच्या आश्रित गायतापारा गावात बॅनर व पोस्टर्स लावले. दोन्ही खांणींना पाठींबा दिल्याचे नक्षल्यांचे म्हणणे आहे. खाणीमुळे येथील जल जंगल जमिनीचे मोठे नुकसान होणार आहे ज्यासाठी हे लोक जबाबदार असतील. नदयांचे पाणी अडविण्यासाठी मोठे धरणही बांधले जात आहे. याकरिता नक्षली नेते विरोध करीत आहे. नक्षल्यांनी सरपंच आणि उपसरपंच यांना हात पाय कापून टाकण्यात येईल अशी धमकी दिली आहे. खाण आणि धरणाच्या बांधकामात हे लोक मदत करत आहे, त्यामुळे त्यांना जनतेच्या कोर्टात उभे केले जाईल असे नक्षल्यांचे म्हणणे आहे.
यापूर्वी काही दिवसांपूर्वी नक्षल्यांनी एका नेत्याची हत्या केली होती त्याच्यावर खाणींना मदत केल्याचा आरोप होता. आता मात्र धमकी मिळालेेले सरपंच व उपसरपंच प्रचंड दहशतित आहे.
जुन महिण्यात बस्तरमध्ये नक्षल्यांचा जनपितुरी सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात नक्षली प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या बैठका घेतात असे सांगणयात येते. या सप्तहाच्या पार्श्वभूमिवर आता पेालीसही सतर्क झाले आहे.
(the gdv, the gadvishva, bastar, naraynpur cg news, )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here