धक्कादायक : करंट लागून तीन हत्तींचा मृत्यू

4373

– दोन प्रौढ आणि एका शावकाचा समावेश, वनविभागात खळबळ
The गडविश्व
रायगड (छ.ग), दि. २६ : रानटी हत्तीचा जंगल परिसरात करंट लागून मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगडमधील रायगडमध्ये शुक्रवारी रात्रोच्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्यामध्ये दोन प्रौढ आणि एका शावकांसह तीन हत्तींचा सामवेश आहे. सदर घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, तमनर वन परिक्षेत्रातील बकचाबा बीट येथील चुहकीमार कायमस्वरूपी रोपवाटिकामध्ये शनिवारी सकाळी तीन हत्तींचे मृतदेह आढळून आले. याबाबत वन कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच डीएफओसह वन कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जंगल परिसरात रानटी हत्तींचा वावर असून हत्तीचा कळप तमनर वन परिक्षेत्रातील बकचाबा बीट येथील चुहकीमार रोपवाटिका मध्ये पोहचला असता रोपवाटिका मध्ये लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांना तीन हत्तींचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. घटनस्थळ हे तमनार पर्वतरांगेतील समरुमा जंगल आहे, हा हत्तींचा मार्ग आहे. ११ केव्ही वायरच्या संपर्कात आल्याने हत्तींचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विद्युत प्रवाहामुळे जवळचे गवतही जळाले आहे. सदर घटनेनंतर पंचनामा करून हत्तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात फिरणाऱ्या हत्तींची संख्या १५८ वर पोहोचली असल्याचे समजते. घरघोडा रांगेत ७८ हत्तींचा समूह आहे. त्याचवेळी अमलीडीह परिसरात 48 आणि कमतारा परिसरात 30 हत्ती फिरत आहेत. अशा स्थितीत रात्र पडताच हत्ती जंगलातून बाहेर पडत शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here