चातगाव वनपरिक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात

7

चातगाव वनपरिक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात
– श्रमदानातून पाच वनराई बंधाऱ्यांची उभारणी; विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
The गडविश्व
ता.प्र/धानोरा, दि. १६ : वन्यजीवांचे संरक्षण आणि मानव-वन्यजीव सहजीवनाचा संदेश देण्यासाठी चातगाव वनपरिक्षेत्रात १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहानिमित्त श्रमदानातून पाच वनराई बंधारे उभारण्यासह विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.
वनवृत्त गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक आर्या व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सप्ताहात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, तर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये चातगाव, मेंढाटोला, कारवाफा, आंबेशिवणी, गिलगाव आणि अमिर्झा येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्पर्धांमधील विजेत्यांना सहाय्यक वनसंरक्षक अंबरलाल मडावी, चातगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के, दक्षिण धानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार आणि उत्तर धानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी कृणाल दोनोडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वन्यजीवांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन आणि निसर्गाशी सुसंवाद राखण्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सप्ताह यशस्वी करण्यासाठी वनपाल कीर्तिचंद कऱ्हाडे, प्रशांत रामणे, मोहन म्हस्के, विजय कंकलवार यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here