भाजपने भाकरी फिरवली, गडचिरोलीत विद्यमान आमदारांना डावलून डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवारी जाहीर

1591

The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीची दुसरी यादी जाहीर केली आज शनिवार २६ ऑक्टोबर रोजी जाहीर केली. भाजपने भाकरी फिरवत गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी विद्यमान आमदार डॉ. होळी यांना डावलून डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आली त्यादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रासह इतर क्षेत्राची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवारीचा तिढा सुटलेला नव्हता. विद्यमान आमदारांसह डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. चंदा कोडवते यांचे नाव भाजपच्या वतीने पुढे येत होते. विद्यमान आमदार डॉ. होळी तर आपल्यालाच उमेदवारी जाहीर होणार विश्वासाने संपूर्ण विधानसभा पिंजून काढत विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात पाऊल टाकून उमेदवारी अर्ज दाखल करून रणशिंग फुंकले. मात्र भाजपने ऐनवेळी भाकरी फिरवत विद्यमान आमदार डॉ.होळी यांना डावलून डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. मिलिंद नरोटे यांना आता भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने विद्यमान आमदार डॉ. होळी काय पवित्रा घेतात याकडे लक्ष लागले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolinews #vidhansabhaelection2024 #milindnarote )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here