खळबळजनक : ‘त्या’ रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा पोहचला २३३ वर

2055

– सुमारे ९०० जन गंभीर जखमी
The गडविश्व
बालासोर, ३ जून : ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसच्या झालेल्या भीषण अपघातात रात्रोपर्यंत ५० जणांचा मृत्यू तर ३५० पेक्षा अधिकजण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली होती मात्र आता यात वाढ झाली असून मृतांचा आकडा तब्बल २३३ वर पोहचला असून सुमारे ९०० जण गंभीर जखमी असल्याचे कळते.
शुक्रवार २ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की कोरोमंडल एक्स्प्रेस समोरून येणाऱ्या मालगाडीला धडकली, यानंतर ट्रेनचे डबे दुसऱ्या ट्रॅकवर गेले, दुसऱ्या ट्रॅकवरूनही ट्रेन येत होती, त्यामुळे दोन नाही तर तीन ट्रेनचा अपघात झाला आहे.
ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढत आहे. अपघातस्थळावरुन मिळालेल्या अहवालात हा आकडा २३३ वर पोहोचला आहे. तर जखमींची संख्या ९०० च्या आसपास आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे रुळावरून घसरल्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्री म्हणाले की, ‘अपघात दुर्दैवी होता, आणि त्यांच्या मंत्रालयाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच बचावकार्य सुरू झाले.’ एनडीआरएफ, ओडीआरएएफ आणि अग्निशमन विभागाच्या पथकांना बचावासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here