– जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आदेश केले जारी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : मागील ३ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झाल्याने वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बांडिया, इंद्रावती इ. नद्यांच्या पाण्याची पातळी ही वाढत आहे. सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने ३७ मार्ग बंद आहे. शिवाय गोसेखुर्द धरणातून सध्या सुरु असलेले विसर्ग वाढविण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या २२ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र, यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये सोमवार २२ जुलै, २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

(#thegdv #gadchirolinews #thegadvishva #gadchirolilocalnews #gadchirolipolice )