परदेशात शिक्षणासाठी मिळते शिष्यवृत्ती : असा करा अर्ज ८ जूनपर्यंत सादर

99

– इच्छुकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, ३ जून : परदेशात शिक्षणासाठी शासनातर्फे शिष्यवृत्ती मिळत असते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत येत असलेले अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणेबाबत अर्ज मागविण्यात आले आहेत. सन २०२३-२४ साठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे व त्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार आयुक्तालय स्तरावर राबविण्यात येत आहे. तसेच १६ मार्च चे शासन निर्णयान्वये प्रस्तुत योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ६.०० लाख पर्यंत वाढविण्यात आले आहे.

 येथे अर्ज उपलब्ध 

प्राचार्य, मुख्याध्यापक, शासकीय, अनुदानित, आश्रम शाळा तसेच एकलव्य, वसतिगृह व कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी ता.अहेरी जि. गडचिरोली मध्ये निशुल्क उपलब्ध आहे.

सदर योजनेचा जास्तीत जास्ती लाभ घेण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज परिपूर्ण भरुन ०८ जूनपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथे सादर करण्यात यावा असे सहायक प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी अहेरी यांनी कळविले आहे.

 योजनेत या शिक्षणाचा समावेश 

या योजनेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवींचा समावेश आहे. एमबीए साठी २ संख्या उपलब्ध असून यात पदव्यूत्तर पदवीचा समावेश आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पदवी १ व १ पदव्यूत्तर पदवीचा समावेश आहे. बीटेक इंजिनीअरींग मधेही पदवी १ व 1१ पदव्यूत्तर पदवीचा समावेश आहे. विज्ञान अभ्यासक्रमासाठी १ पदव्यूत्तर पदवीचा संख्येचा समावेश आहे. कृषि साठीही १ पदव्यूत्तर पदवीचा संख्येचा समावेश आहे. इतर विषयांमधे २ पदव्यूत्तर पदवीचा संख्येचा समावेश आहे. अशा प्रकारे २ पदवी, ८ पदव्यूत्तर पदवी अशा १० संख्येंचा समावेश आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज परिपूर्ण भरुन ८ जूनपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथे सादर करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news,Scholarships available for studying abroad: Apply by June 8)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here