सावली : गोवंश तस्करांच्या आवळल्या मुसक्या, वाहनासह साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त

607

गोवंशाची सुटका
The गडविश्व
सावली, दि.०३ : गडचिरोली मार्गे गोवंशाची अवैध रित्या वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचुन ट्रकसह साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई सावली पोलिसांनी मध्यरात्री केली. याप्रकरणी शेख जाकीर शेख मेहबूब, इर्शाद उल्लाह खान किस्मत उल्ला खान दोन्ही रा.मुर्तीजापुर जिल्हा अकोला, मोहसीन अली मोबीन अली रा.आकोट जिल्हा अकोला याना अटक करून विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या दिशेकडून मूल कडे गोवंशाची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती सावली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा कारवाईत एमएच ४० सीएम २६१४ क्रमांकाच्या ट्रकला थांबवून झडती घेतकी असता त्यामध्ये ३५ गोवंश जनावरे क्रूरपणे बांधलेले दिसून आले. दरम्यान सर्वच गोवंशाची सुटका करून गोशाळेत दाखल केल्याची माहिती आहे. तर या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच यावेळी गोतस्करीकरिता वापरण्यात आलेला ट्रक व गोवंश असा एकूण १५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या नेतृत्वात सावली पोलीस स्टेशनचे विशाल दुर्योधन, रामदास कोंडबत्तूवार, संजय शुक्ला, पो शि चंदू गंपलवार, विजय कोटणाके यांनी केली.
सदर कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here