शिष्यवृत्ती परीक्षेत रांगी केंद्रातील ७ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

68

शिष्यवृत्ती परीक्षेत रांगी केंद्रातील ७ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
– रांगी व मिचगाव (बुज) शाळांतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि.२० : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE), पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी (पूर्व प्राथमिक) शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, धानोरा तालुक्यातील रांगी केंद्रातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद पी.एम.श्री रांगी शाळा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मिचगाव (बुज) येथील एकूण ७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता प्राप्त केली आहे.
जिल्हा परिषद पी.एम.श्री रांगी येथील शौर्य ठुमराज कुकडकार, यश सुनिल मेश्राम, खिलेश्वरी नितीन कावळे व पूर्वा कामेश कांटेगे या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मिचगाव (बुज) येथील अवनी गिरिधर पुन्घाटे, रिया केशव आतला व लक्ष्मी पंकज कडुकार यांनीही घवघवीत यश संपादन करत शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here