जप्पीच्या सरपंच रागिनी हिचामी यांचा राजीनामा

7

जप्पीच्या सरपंच रागिनी हिचामी यांचा राजीनामा
– पुढील शिक्षणासाठी पदाचा त्याग
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २८ : धानोरा तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत थेट जनतेतून निवडून आलेल्या जप्पी ग्रामपंचायतीच्या सरपंच रागिनी हिचामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी २४ एप्रिल रोजी पंचायत समिती धानोरा येथील प्रशासक रोशन कुमार दुबे यांच्याकडे राजीनामा सादर केला.
जप्पी ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाला अवघे सात महिने शिल्लक असताना अचानक सरपंचांनी पदाचा राजीनामा दिल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. राजीनाम्याबाबत विचारले असता रागिनी हिचामी यांनी पुढील शिक्षणासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
त्या म्हणाल्या की, शिक्षणासाठी वेळ द्यावा लागत असल्याने ग्रामपंचायतीत वेळेवर उपस्थित राहणे शक्य होत नव्हते. तसेच ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात सक्रिय सहभाग घेणेही अडचणीचे होत होते. त्यामुळे जबाबदारी पार पाडण्यात अडथळे येत असल्याने पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सरपंच पद रिक्त झाल्याने जप्पी ग्रामपंचायतीच्या पुढील कारभाराबाबत उत्सुकता निर्माण झाली असून आता प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here