– १२० रुग्णांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात बुधवार १८ सप्टेम्बर २०२४ रोजी मूत्रविकार व त्वचाविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले होते. या विशेषज्ञ ओपीडी करीता दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी, वर्धा येथील विशेषज्ञ यांनी १२० रुग्णांची आरोग्य तपासणी केली.
मूत्रविकार ओपीडी मध्ये मूत्राशयाचा कर्करोग, अंडाशयावर सूज, किडनी स्टोन, मूत्राशय पिशवी मध्ये स्टोन असणे,लघवीची नळी चिपकलेली असणे , मूत्राशय नळीमध्ये स्टोन अटकलेला असणे , प्रोटेस्ट ग्रंथीची वाढ होणे तसेच लघवीतून रक्त जाणे, लघवी अटकत/ थांबत येणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांना मूत्रविकार तज्ञांचे मार्गदर्शन व उपचार सुविधा देण्यात आली . तसेच शरीरावर पांढरा चट्टा कोड व खाज, मुरूम/ तारुण्यपिटिका, केस गळती, कोंडा होणे, गजकर्ण, खरूज, सोरायसिस, नखांचे आजार तसेच नागिन अशी लक्षणे असलेल्या रुग्णांना त्वचाविकार ओपीडी मध्ये उपचार सुविधा प्रदान करण्यात आली. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत प्रदान करण्यात आली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #muktipath )