The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १९ : लोहार, सूतार, बेलदार तसेच तत्सम कामागाराचे दैवत भगवान विश्वकर्मा यांचा जयंती निमीत्य मंगळवार १७ सप्टेबंर रोजी सकाळी ८ ते सांयकाळी ५ वाजेदरम्यान जय विश्वकर्मा सार्वजनिक मिस्त्री मंडळ धमदीटोलाच्या वतीने धमदीटोला येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सकाळी भगवान विश्वकर्मा यांचा मूर्तीचा घटस्थापना करण्यात आली. तद्नंतर भजन, पूजन तसेच सांयकाळी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी पंचायत समिति सभापती गिरीधर तितराम, माजी पं.स. सदस्य धरमदास उईके, रामप्यार मडावी, जय विश्वकर्मा सार्वजनिक मिस्त्री मंडळाचे अध्यक्ष नरेश सोनकुकरा, उपाध्यक्ष मुरली बख्खर, सचिव बनस कपूर, सहसचिव पूरूषोत्तम कोराम, बलराम साहळा, केशव बंजारे, शालीक डोगंरी, दिलीप मडावी, सुधीर कोराम, श्यामकीसन सेंदूर, शिवराम मडावी, संताराम मिरी, महेंद्र गंगासागर, त्रिवेन पंधरे, राजू नैताम, विजय कोराम, अदन मडावी, संतोष कूंजाम, पिताबंर कूंजाम, देविदास पंधरे, यशवंत कपूर, विलास सिंगारे, धर्मराज सिंगारे, राकेश साहळा, गजानन साहाळा, निलेश नैताम, पवन कुमरे, मानिक जाता, जागेश्वर मिरी, लालाजी नैताम, हिरालाल साहाळा, प्रदिप नाईक, गोवर्धन जाता, अजय साहाळा, विजय कुमरे, माहासिंग पंधरे, हेमराज कोराम, लखन सोनकुकरा, चैतराम केवास, प्यारा साहळा, भिष्मा जूळा, विक्रम कोराम, चेतन गंगासागर तसेच गावकरी उपस्थीत होते.
