पोलीस-नक्षल चकमक : २ महिला नक्षलीसह तिघांना अटक

2394

– घटनास्थळावरून शोधमोहिमेत स्फोटक व इतर सहित्य जप्त
The गडविश्व
बिजापूर, २१ जानेवारी : पोलीस नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना१८ जानेवारी रोजी इडेनार जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव बघता नक्षल्यांनी जंगलात पळ काढला असता शोधमोहीमेदरम्यान २ महिला2 नक्षलींसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
गुड्डू कुसराम (गांगलोर एलओएस सदस्य) वडील पांडू कुसराम (२५) वर्षे रा.इशुलनार पोलीस स्टेशन विजापूर, हुंगी अवलम (पक्ष सदस्य) पती मासा(२७) रा. पिडीया पोलीस स्टेशन गांगलूर, इडो (पक्ष सदस्य) वडील लखमू ओयाम (२८) रा. पिडिया ठाणे गांगलूर असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बिजापूर जिल्हयात नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना १७ जानेवारी रोजी बासागुडा-गांगलोर आणि किरंदुल या सीमावर्ती भागात नक्षल्यांच्या मोठ्या नेत्याची उपस्थितीची गुप्त माहिती मिळाली असता त्या माहितीच्या आधारे डीआरजी टीम, एसटीएफ (STF), महिला कमांडो व दंतेवाडा-विजापूरच्या कोब्रा २१० (CoBRA 21) हे संयुक्त पथक पेडियाकडे रवाना झाले होते. दरम्यान १८ जानेवारी रोजी नक्षल्यांनी इडेनारच्या जंगलात पोलीस दलावर अंदाधुंद गोळीबार केला यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे वाढता दबाव बघता नक्षली घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून गेले. घटनास्थळ परिसरात शोधमोहिम राबविली असता ८ ते १० संशयित बॅकपॅकसह पळताना दिसले तर २ महिला आणि १ पुरुषांना सुरक्षा दलांनी वेढा घालत घटनास्थळावरून पकडले. या संशयितांकडे ठेवलेले थैला व बॅग तपासले असता टिफिन बॉम्ब, जिलेटिन रॉड, कार्डेक्स वायर, डिटोनेटर, इलेक्ट्रिक वायर, बॅटरी, प्लास्टिक मेम्ब्रेन जप्त करण्यात आले. तर अटक करण्यात आलेल्या गुड्डू कुरसम (गांगलूर एलओएस सदस्यावर) छत्तीसगड सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. १९ जानेवारी रोजी गांगळूर पोलीस ठाण्यात परत आल्यानंतर आरोपीविरुद्ध विरुद्ध गांगळूर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करून बीजापूर न्यायालयात न्यायालयीन कोठडीवर हजर करण्यात आले.

(The Gadvishva) (Bhijapur Chattisgarh) (Naxal police Firing) (2023 News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here