आरमोरी परिसरात अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन

738

– प्रशासनाचे दुर्लक्ष
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, २१ जानेवारी : गौणखनिजातून महसूल विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत असतो. मात्र नाममात्र शुल्क भरून रॉयल्टीच्या नावाखाली रॉयल्टीच्या क्षमतेपेक्षा अधिक मुरुमाचे उत्खनन आरमोरी तालुक्यात होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
आरमोरी तालुक्यात तलाठी सांजा शेगाव, शेतशिवारातून महसूल विभागात नाममात्र शुल्क भरून रॉयल्टीने मुरुमाचे उत्खनन करण्यात येत आहे. मुरूम उत्खननासाठी शासनाची नियमावली ठरलेली आहे, परंतू नियमावलीचे आदेश झुगारून क्षमतेपेक्षा अधिकचा अवैधरित्या मुरूम उत्खनन केले जात असल्याचे चित्र आरमोरी तालुक्यात दिसून आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. तालुक्यातील आणखी नेमक्या कोणत्या परिसरात हे अवैध मुरूम उत्खनन होत आहे व यांमध्ये कोणाचे वरदहस्त आहे हे अजुनही गूलदस्त्यात आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Bundesliga) (Hyderabad FC) (Mission Majnu) (Radhika Merchant) (Usain Bolt)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here