एटापल्ली शहरात खर्राबंदी ; मुक्तीपथ शहर संघटनेतर्फे पोलिस विभागाचे अभिनंदन

149

-एटापल्ली येथे हळदी-कुंकू कार्यक्रम
The गडविश्व
गडचिरोली,२१ जानेवारी : एटापल्ली शहरात खर्राबंदी लागू केल्यामुळे शहरातील खर्रा विक्रीचे प्रमाण कमी झाले आहे.याबद्दल एटापल्ली शहर संघटनेच्या महिलांनी हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येत पोलिस विभागाचे अभिनंदन केले आहे.
एटापल्ली येथे मुक्तीपथ शहर संघटनेच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंदना गावडे हे होत्या. प्रमुख अतिथी म्हणुन गीताबाई मोहुर्ले, चीनक्का पिल्लीवार, पोलीस स्टेशन एटापल्लीचे पोलीस उपनिरीक्षक सविता काळे , आर आर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस एस बंडावार व शिक्षक, मुक्तीपथ तालुका संघटक किशोर मलेवार, तालुका प्रेरक रवींद्र वैरागडे, स्पार्क कार्यकर्ती रुणाली कूमोटी यांच्यासह शहरातील महिला उपस्थित होत्या.
यावेळी एटापल्ली शहरात खर्राबंदीची अंमलबजावणी केल्यामुळे खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण पूर्वी जसे होते तसे खुलेआम दिसत नाही. याबद्दल मुक्तीपथ शहर संघटनेच्या महिलांनी अभिनंदन पत्र तयार करून पोलिस विभागाचे अभिनंदन केले. दरम्यान, कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदना गावडे यांनी शहरात खर्राबंदी सोबत संपूर्ण दारूबंदी आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. पोलीस उपनिरीक्षक सविता काळे यांनी आपले मार्गदर्शनात शहरातील खर्राबंदी अधिक कडक करून शहर वासीयांच्या सहकार्याने दारू व खर्रामुक्त शहर करू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाला शहर संघटनेच्या महिलांसह शहरातील महिला उपस्थित होत्या.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Bundesliga) (Hyderabad FC) (Mission Majnu) (Radhika Merchant) (Usain Bolt)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here