प्रश्नमंजुषा उपक्रमातून २३९ विद्यार्थ्यांना लक्षात आले व्यसनाचे दुष्परिणाम

51

– सात केंद्रातील १४ शाळांची तालुकास्तरावर निवड
The गडविश्व
गडचिरोली, २१ जानेवारी : मुक्तीपथ तर्फे गडचिरोली तालुक्यातील सात केंद्रातील विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या एकूण १४ शाळांची तालुकास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, या उपक्रमात एकूण २३९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व्यसनाचे दुष्परिणाम जाणून घेतले.
गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत मुक्तीपथ तर्फे जिल्ह्यातील बाराही तालुक्यामध्ये शाळा तंबाखूमुक्त करणे बाबत शाळा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रश्नमंजुषा स्पर्धा गडचिरोली तालुक्यातील जिल्हा परिषदच्या सर्व शाळांमध्ये घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यामध्ये सात केंद्रावर हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेतून व्यसनाचे प्रकार, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, दारू व तंबाखू विरोधी असलेले कायदे याची माहिती आत्मसात केली. सोबतच विद्यार्थ्यांना व्यसनापासून कसे दूर करणार? काय पद्धती वापरणार, कृती करणार या विषयावर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
पोटेगाव केंद्राअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत जिप शाळा राजोली, सावेला, पोटेगाव, कोसमघाट, रायपूर, आश्रमशाळा पोटेगाव अशा सहा शाळेतील २४ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात शासकीय आश्रमशाळा पोटेगाव व जिप शाळा कोसमघाटची तालुकास्तरावर निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून पी.बी.भोयर यांनी काम पाहिले. अमिर्झा केंद्रातील स्पर्धेत धुंडेशिवणी, मुरमाडी, बेलगाव, मरेगाव, अमिर्झा, टेंभा, मौशिखांब, चांभार्डा या आठ शाळांतील ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून एस.एस.तारगे उपस्थित होते. या क्लस्टरमधील धुंडेशिवणी व बेलगाव शाळेची तालुकास्तरावर निवड झाली. आंबेशिवणी केंद्रातील जिप शाळा आंबेटोला, बाम्हणी, जेप्रा, खुर्सा, गिलगाव, दिभना, सावरगाव या शाळांतील ५२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून ए. आर.मेश्राम उपस्थित होते. यात आंबेटोला व आंबेशिवणी या शाळेने यश पटकाविले. येवली केंद्रातर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेत शिवणी, वाकडी, मारकबोडी, येवली व हिरापुर या शाळेतील २३ विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून मडावी यांनी काम बघितले. या स्पर्धेतून मारकबोडी व शिवणी शाळेची तालुकास्तरावर निवड झाली. गुरवळा केंद्रातील चांडाळा, मेंढा, विहिरगाव, हिरापुर, मारोडा व चांदाळा येथील दोन आश्रमशाळेच्या एकूण ३१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून बालापुरे व शंकरवार उपस्थित होते. या स्पर्धेत चांदाळा व मेंढा येथील शाळेने यश प्राप्त केले. मूरखळा केंद्रा अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत जिप शाळा कोटगल, नवेगाव, कनेरी, मुडझा, पारडी, इंदाळा, मूरखळा व पुलखल या शाळेतील ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून केंद्रप्रमुख दिलीप मुप्पीडवार, विनय सलामे यांनी काम बघितले.या केंद्रातून मुडझा व कोटगल शाळेची तालुकास्तरावर निवड झाली. काटली केंद्रातील स्पर्धेत नगरी, काटली, साखरा, गोगाव व चुरचुरा या शाळेतील ३२ विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून केंद्रप्रमुख खोब्रागडे, मुख्याध्यापक बांबोळे यांनी काम पाहिले. या उपक्रमात गोगाव व काटली शाळेने यश प्राप्त केले. या उपक्रमाची यशस्वीतेसाठी सर्व शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे नियोजन मुक्तीपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम व स्पार्क कार्यकर्ती स्वीटी आकरे यांनी केले.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Bundesliga) (Hyderabad FC) (Mission Majnu) (Radhika Merchant) (Usain Bolt)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here