गडचिरोली : पोलीस शिपाई भरती २०२१ लेखी परीक्षा करीता पात्र उमेदवारांची यादी जाहीर

3207

– काही आक्षेप असल्यास २३ जानेवारी पर्यंत नोंदविण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, २० जानेवारी : जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ करीत मैदानी चाचणी परीक्षा ५ जानेवारी २०२३ पासून घेण्यात आली होती. मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे आधारे लेखी परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच लेखी परिक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांना सूचना कळविण्यात आल्या आहेत.

लेखी परीक्षा यादी

यादी डाउनलोड करा

सूचना :

पोलीस शिपाई भरती – २०२१ करीता महाराष्ट्र शासन, राजपत्र गृह विभाग, २३ जुन २०२२ अन्वये शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार संबधीत प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणी साठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असणार आहेत. लेखी चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी ही उमेदवारांचे माहितीकरीता पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
पोलीस शिपाई भरती – २०२१ मधील लेखी चाचणी करीता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीमधील प्रसिध्द करण्यात आलेल्या यादी मध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या वेळेपासुन ते सोमवार २३ जानेवारी २०२३ चे सायकाळी ०५:०० वाजेपर्यत पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष येथे व्यक्तीगतरित्या हजर राहुन आक्षेप नोदंवु शकतात. २३ जानेवारी २०२३ च्या सायकांळी ०५:०० वाजेनतंर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही आक्षेपांची नोंद घेतली जाणार नाही.
लेखी चाचणी करीता पात्र झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा कोणत्या दिनांकास आयोजित करण्यात येणार आहे. त्याबाबत उमेदवारांना त्यांच्या भ्रमणध्वनी व ईमेल आयडीवर दिनांक व लेखी चाचणीचे स्थळ कळविण्यात येईल.
उमेदवारानी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडु नये तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पोमके / पोलीस मुख्यालय येथे संपर्क साधावा.

(The Gadvishva) (Gadchiroli Police Recruitment 2021 list) (Gadchiroli News Updates) (List of eligible candidates for Police constable recruitment 2021 written exam announced)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here