आरमोरीत अंगणवाडी सेविकांचा मोबाईल वापसी आंदोलन

272

– शासनाने निकृष्ट दर्जाचे मोबाईल दिल्याने केले परत
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी (नरेश ढोरे) : शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल अंत्यंत निकृष्ट दर्जाचे असुन वारंवार बिघाळ होतो. त्याचा दुरुस्तीचा भुर्दंड सेविकांना सोसावा लागतो त्यामुळे १७ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२१ पर्यंत राज्यभर मोबाईल परत करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. याचा एक भाग म्हणून १९ जानेवारी २०२३ रोजी आंदोलनाचा टप्पा आरमोरी येथील एकात्मिक बाल विकास अधिकारी कार्यालय येथे आरमोरी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आपले एकूण मोबाईल १४७ सर्वांनी “मोबाईल वापसी आंदोलन” करुन परत केले.
आरमोरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांनी एकात्मिक बाल विकास अधिकारी कार्यालया समोर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी धरणे आंदोलन केले. यात प्रामुख्याने निकृष्ट दर्जाचे मोबाईल फोन म्हणजे मोबाईल बंद होने, लवकर गरम होने, आपोआप डिस्प्ले जाने, त्यामुळे काम करण्यास अडथळा निर्माण होतो. याबाबत आयटक व अंगणवाडी कृती समितीने वारंवार निवेदने देऊन चांगल्या दर्जाचे मोबाईल देण्यात यावे. हि मागणी केली होती. परंतू शासनाने कानाडोळा केला, आता मोबाईल ची गरंटी वारंटी संपली असून बिगाड झालेले मोबाईल चा खर्च येतो, तो कसा करायचा म्हणून प्रकल्प कार्यालयात मोबाईल आम्ही संपूर्ण अ़ंगणवाडी सेविका परत करीत आहोत. शासनाने दिलेला मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असुन वारंवार बिघाळ होते व वारंवार नादुरस्त होतो, अप्स डाऊनलोड होत नाही, दुरूस्तीस तीन ते चार हजार रुपयांची गरज राहते, शासनाने जुने मोबाईल परत घ्यावे व नविन चांगल्या दर्जाचे मोबाईल, क्षमता असलले आधूनिक मोबाईल देण्यात यावे व अन्य मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी आयटक चे जिल्हा संघटक देवराव चवळे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे राज्य सदस्य का.डा.महेश कोपूलवार , यांनी आंदोलन कर्ता अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.शिलू चिमुरकर ,चुन्नीलाल मोटघरे ,मिनाक्षि ताई,उपस्थित होते.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी माधूरी रामटेके , रेखा जांभुळे,सुधा चन्ने,आशा बोडने, रुपाली क्षिरसागर, मिरा कुरवे, अल्का लावूडकर इत्यादि अथक परिश्रम घेतले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Anganwadi workers’ mobile withdrawal movement in Armori)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here