पोलीस-नक्षल चकमक : २ महिला नक्षलीसह चार नक्षली ठार

3055

– मोठ्या प्रमाणात स्फोटक व इतर साहित्य घटनस्थळावरुन जप्त
The गडविश्व
विजापूर, २६ नोव्हेंबर : जिल्ह्यातील मेरतुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोमर जंगल परिसरात सकाळी ७:३० ते ७:४५ वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत २ महिला आणि २ पुरुष नक्षली ठार झाले.

मेरतुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोमरा जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) च्या जवानांनी पहाटे येथे शोधमोहीम राबवत असतांना चकमक उडाली. सुमारे २ तास चकमक उडाल्याचे कळते. दरम्यान जवानांचा वाढता दबाव पाहता नक्षली जंगलात पसार झाले व चकमकीनंतर घटनास्थळाची झडती घेतली असता चार नक्षलींचे मृतदेह आढळून आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष नक्षलीचा समावेश आहे. तसेच घटनास्थळावर ३०३ रायफल ०१ नग, ३१५ बोअर रायफल ०१ नग, ०२ नग देशी बनावटीची बंदूक, स्फोटक साहित्य, इतर माओवादी साहित्य आढळून आले असता ते जप्त करण्यात आले.

*The Gadvishva #naxal #firing #Police-naxal #Police naxal encounter

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here