धानोरा : जे .एस. पी. एम. महाविद्यालयात संविधान दिन साजरा

136

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २७ नोव्हेंबर : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिकनश्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समान संधी केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत सामाजिक न्याय पर्व संदर्भाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंढरी वाघ, डॉ. विना जमब्बेवार, डॉ. गणेश चूधरी विचारपीठावर उपस्थित होते.
संविधान दिनाची सुरुवात भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितितांनी संविधान म्हणजे काय ? संविधानाचे महत्त्व व इतिहास याविषयी यथोचित मार्गदर्शन केले. तसेच संविधानातील उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करून लोकशाही संवर्धनासाठी भारतीय संविधानाचे योगदान व भूमिका भारतीय संविधानासमोरील आव्हाने व उपाय भारतीय संविधान व आजची परिस्थिती या विषयावर निबंध स्पर्धा आणि माझे संविधान माझा अभिमान या संकल्पनेवर पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
संचालन प्राध्यापक बनसोड तर आभार डॉ. प्रियंका पठाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.लांजेवार, डॉ. गोहने, डॉ. झाडे, प्रा.वाळके, डॉ. धावणकर, प्रा. भैसारे, प्रा. तोंडरे, प्रा. पुण्यप्रेड्डीवार, प्रा. धाकडे, प्रा. खोब्रागडे, प्रा. करमणकर, प्रा. आवारी यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here