आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू
– विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली,दि. २४ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृहांमध्ये नवीन प्रवेश तसेच नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय वसतिगृहांसाठी पात्र विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही अडचण न येता वेळेत प्रक्रिया पूर्ण करून शासकीय वसतिगृह सुविधांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असून विद्यार्थी व पालकांनी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे प्रशासनाने सांगितले आहे. अर्जासाठी लिंक: [Swayam MahaOnline Portal] https://swayam.mahaonline.gov.in
या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा अधिक चांगला लाभ मिळणार असून शिक्षणातील गळती कमी होण्यास मदत होणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













