स्वतः मधील कलागुणांना ओळखून वाव देत समोरची वाटचाल करावी : वैद्यकीय अधीक्षक डॉ. टेकाम

206

The गडविश्व
कोरची-कुरखेडा, २६ जानेवारी : विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले गुण ओळखून त्यांना विकसित करत विविध क्षेत्रात आपले आयुष्य निर्माण करावे असे प्रतिपादन कोटगुल येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरीष टेकाम यांनी केले.
ते कोरची पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या राष्ट्रीय शिक्षण संस्था अंगारा द्वारा संचालित धनंजय स्मृती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळभट्टी येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय वार्षिक सांस्कृतिक मोहत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उदघाटक स्थानावरून बोलत होते. पुढे बोलतांना डॉ. हरीश टेकाम यांनी पुढे असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेछा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून मुंगमोडे, प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार चेतन गहाणे, सौ. संग्रामे मॅडम, बोगा मॅडम, कुकडे, दुर्योधन ताटपालन, भगत कार्यपाल, संग्रामे, गणपत वाट्टे, रमेश मरकम, निर्भय फुलारे, गौतम कढईबॉईर, धनुराम मडावी, रामनाथ फुलारे, धनंजय ताटपाल उपस्थित होते. प्रस्तावना धुर्वे यांनी केली तर आभार मुंगूलमारे यांनी मानले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Kotgul Deulbhatti) (Dr.Harish Tekam)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here