गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या दिवशीही नामनिर्देशनपत्र दाखल नाही

549

-46 नामनिर्देशन अर्जाची उचल
The गडविश्व
गडचिरोली दि. २१ : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. निवडणूक नानिर्देशनपत्र दाखल करण्यास काल २० मार्च पासून सुरूवात झाली आहे मात्र काल व आज दोन्ही दिवशी कोणाकडूनही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले नाही.
काल २० मार्च रोजी ४ व्यक्तींकडून १४ नामनिर्देशन अर्ज तर आज २१ मार्च रोजी ८ व्यक्तींनी एकूण ३२ नामनिर्देशन अर्ज खरेदी केले आहे. लोकसभा मतदार संघात आतापर्यंत एकूण ४६ नामनिर्देशन अर्जाची उचल झाली आहे.
१२- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघासाठी बुधवार २० मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. २७ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.१९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता ६ जून पर्यंत लागू राहणार आहे.
(#thegdv #thegadvishva #loksabha_election2024 #gadchirolinews #gadchirolichimur)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here