दुधमाळा संस्थेने खरेदी केलेले धान्य अवकाळी पावसाने भिजले

388

गोडावुन अभावी धान्य उघड्यावर
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २० : तालुक्यातील दुधमाळा येथील सोसायटीने खरेदी केलेले धान्य खुल्या जागेत उघड्यावर ताडपत्री झाकुन ठेवलेले असताना १९ मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पाऊस व गारपिटीने येथील धान्य पावसाने भिजले. गोडावून अभावी उघड्यावर खरेदी करून मेनकापड ताडपत्रीने झाकून ठेवलेले धानाच्या ढिगावरील ताडपत्री उडाली त्यामुळे धान्य उघड्यावर पडले आणि पावसाने भिजल्याने धान्य किती सुरक्षित ठेवतात या बाबत संस्थेची खरी पोल खोलली. त्यामुळे आता लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
धानोरा तालुक्यातील दुधमाळा येथिल सोसायटीने धान खरेदी योजने अंतर्गत धान्य खरेदी केले. परंतु संस्थेकडे कोणत्याही पद्धतीचे गोडावून नाही. त्यामुळे धान संस्थेच्या पटांगणात उघड्यावर ठेवलेले आहेत. त्या धानावर अनेक लोकांची चोरटी नजर असते. धान्य चोरीला सुद्धा जातात. संस्थेकडे कोणत्याही पद्धतीचे गोडावून नाही त्याचे संपूर्ण धान्य मोकळ्या जागेत फक्त ताडपत्री झाकुन ठेवलेले आहेत. १९ मार्च ला रांगी, मोहली परिसरात गारपीट झाली, जोरदार वादळी अवकाळी पाऊस पडल्याने याची झळ दुधमाळा केंद्राला बसली. येथिल धान खरेदी हंगाम २०२३-२४ मधे धान्य खरेदी केले आणी पावसाचे पाणी पोत्यात शिरले, भविष्यात खराब होनाऱ्या धान्याची जबाबदारी कोण सोसनार असा प्रश्न लोक विचारत आहेत.
आधारभूत धान खरेदी योजना आदिवासी उपयोजन क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ एजंट म्हणून स्थानिक सहकारी संस्थामार्फत राबविली जाते. या खरिप हंगामात दुधमाळा येथील सेवा सहकारी संस्थेने मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी केली. संस्थेकडे कोणत्याही प्रकारचे गोडावुन नसल्याने फक्त ताडपत्री झाकुने ठेवले असताना काल अचानक झालेल्या वादळी पावसाने ताडपत्रीचे तिनं तेरा वाजले. ताडपत्रि फाटली, उडाली आणि धान्य पावसाने भिजले . महामंडळ कडून धानाची उचल होण्यास विलंब होत आहे हे खरे आहे. पण धान्य उचलत पर्यंत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संस्थेची असते. संस्थेशी तसा करार केला जातो. हमिपत्र भरून घेतले जाते. १९ मार्चला रात्री पडलेल्या पावसाने धान्य किती सुरक्षित आहेत हे दाखवून दिले. संस्थेने पाहिजे त्या प्रमाणात काळजी न घेतल्याने धान्य ओले झाल्याचे स्पष्ट दिसुन येते.
उचल होण्यापूर्वी ऊनाने धान्य सुकतात, वादळ उडतात,
उंदिर खातात, घुस पोखरून नासधूस करते यामुळे तुट येते याचा नाहक भुर्दंड संस्थेला पडते त्यामुळे संस्थां अडचणीत येत असतात. तालुक्यातील कोणतीही संस्था स्थापनेपासून फायद्यात नसुन सर्वच तोट्यात दिसुन येतात. यामुळे पुन्हा संस्थेचे फावत असुन धान्य खराब झाल्याचे दाखवले जाते. यावर वेळीच कारवाई होने आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here