पुलखल येथे मुक्तीपथ मॅरेथॉन स्पर्धा : ३७ जणांचा सहभाग

82

The गडविश्व
गडचिरोली, १५ मार्च : तालुक्यातील पुलखल येथे गाव संघटना व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून गावातील महिला, पुरुष व युवक-युवती अशा एकूण ३७ स्पर्धकांसह ग्रामस्थांनी दारूबंदी कायम ठेवण्यासाठी एकी दाखवली.
‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य थीम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. या उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका चमूने दारू व तंबाखूचे दुष्परिणाम पटवून देत व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून स्पर्धेची सुरवात करण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये १६ युवक, ३ युवती, १२ महिला व ६ पुरूष अशा एकूण ३७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. विविध गटातील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सोबतच गावात दारूविक्री बंद असून गावात दारूबंदीचा विजयस्तंभ उभारण्यासाठी नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर यांच्यासह मुक्तीपथ तालुका चमूने केले. यशस्वीतेसाठी प्रशांत कोटगले, सुमनबाई ठाकरे, श्रीकांत सिडाम, गौरव ठाकरे, नंदा भगत, योगिता रामटेके, कुसुम पोरटे, भुपेश कोटगले, प्रशांत कोटगले, दुर्गा दहलकर, अश्विनी ठाकरे, तुषार ठाकरे, भुपेश कोटगले, अजित ठाकरे यांनी सहकार्य केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (GPT-4) (Bihar Board 12th Result 2023) (Poco X5 5G) (Sameer Khakhar) ( Imran Khan) (Lawrence Bishnoi) (Adani Enterprises) ( Northern Lights) (Inter Milan)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here