धानोरा येथील बालआनंद मेळाव्याला आमदार सुधाकर अडबाले यांची भेट ; विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक

114

धानोरा येथील बालआनंद मेळाव्याला आमदार सुधाकर अडबाले यांची भेट ; विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक
The गडविश्व
ता. प्र. / धानोरा, दि. ०३ : धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात नववर्षाच्या स्वागतानिमित्त बालआनंद मेळावा उत्साहात पार पडला. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यवहारिक ज्ञान मिळावे, स्वकष्टाचे महत्त्व समजावे तसेच व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वेणूताई मशाखेत्री, उपाध्यक्ष जमीरभाई कुरेशी, मुख्याध्यापक व्ही. एम. सुरजुसे, डॉ. रश्मी डोके, पी. व्ही. साळवे, पी. बी. तोटावार, एस. एम. रत्नागिरी, प्रा. विजय बुरमवार, प्रा. विलास भोगे, कु. रजनी मडावी, कांचन देशमुखे, अशोक कोल्हटकर, मोहन देवकते, रेखा कोरेवार, प्रियंका आनंदवार यांच्या उपस्थितीत तालुका पत्रकार समीर कुरेशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या बालआनंद मेळाव्यात विविध मनोरंजनात्मक खेळांसह खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः गुलाबजाम, अंडा बिर्याणी, दाबेली, आयुर्वेदिक भजिया, गोलगप्पे आदी चविष्ट पदार्थ तयार करून स्टॉलवर विक्री केली. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने मेळाव्याचा आनंद घेत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पाककलेचे विशेष कौतुक केले.
या मेळाव्याची विशेष बाब म्हणजे नागपूर विभागाचे माध्यमिक शिक्षक आमदार माननीय सुधाकरजी अडबाले यांनी मेळाव्याला भेट देत मनोरंजनात्मक खेळ व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक ओम देशमुख, प्रमोद शेंडे, देवेंद्र भालेराव, उमराणी चेलमेलवार, कीर्ती मॅडम, गीतांजली जुनघरे, भालचंद्र कोटगले, जयराम कोरेटी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here