श्रमदानातून रांगी गावात स्वच्छतेचा संदेश

77

श्रमदानातून रांगी गावात स्वच्छतेचा संदेश
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०३ : तालुक्यातील रांगी गावात राष्टनेता ते राष्ट्रपती सेवा पंधरवडा, मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत गावकऱ्यांनी श्रमदान करून बाजार चौक व परिसराची स्वच्छता केली.
१ ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत “स्वच्छता हीच सेवा” या संकल्पनेला उजाळा दिला. ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक संस्था तसेच ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून बाजार चौक व परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा आदर्श घालून देण्यात आला.
या मोहिमेत ग्रामपंचायत सरपंच सौ. फालेश्वरी गेडाम, उपसरपंच नुरज हलामी, सदस्य राकेश कोरम, दिनेश चापडे, शशिकांत साळवे, सौ. विद्या कपाट, सौ. शशिकला मडावी, सौ. लीलाताई कन्नाके, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भुरसे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अध्यक्षा सौ. ज्योती गेडाम, उपाध्यक्षा सौ. शशिकला भुरसे, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समिती अध्यक्ष शांताराम बरडे, माँ दुर्गा बचत गटाचे सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी मकरंद बांबोडे, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रांगी गावाने एकजुटीने स्वच्छतेचा संदेश देत ग्रामविकासाच्या दिशेने कौतुकास्पद पाऊल उचलले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here