– शहरात दोन दिवस जय जय श्री राम जा गजर
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.२१ : ‘मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा’ फेम गायीका पुजा गोल्हानी आज २१ जानेवारी रोजी कुरखेडा शहरात येणार आहे. त्यामुळे आज संपुर्ण शहर जय जय श्री रामाच्या नावाने गुंजनार आहे.
नवनिर्मित श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील मंदिराच्या भूतल गर्भगृहात प्रभु श्रीरामाच्या बाल स्वरूपाचे प्राण प्रतिष्ठा उदया २२ जानेवारी रोजी करण्यात येत आहे. त्यानिमित्त श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या समिती कुरखेडाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन आज २१ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
शहरातील श्रीराम मंदीर येथे रात्रो ८ वाजता मॉ. शारदा देवी जागरण गृप जबलपूर यांचे जागरण ठेवण्यात आले आहे. या जागरणात ‘मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा’ फेम गायीका पुजा गोल्हानी ह्या उपस्थित राहणार आहे. तर उदया २२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ वाजतापर्यंत कलश यात्रा श्री हनुमान मंदीर ते श्रीराम मंदीर पर्यंत करण्यात येणार आहे. ११ ते १ वाजता पर्यंत प्राण प्रतिष्ठा समारोळ थेट प्रक्षेपण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या समिती कुरखेडाच्या वतीने करण्यात आले आहे.
(the gadvishva, the gdv, gadchiroli, kurkheda, Mere Bharat Ka Bacha Bacha’ fame Puja Golhani today in Kurkheda city )