कुरखेडा : टेम्पो वाहनामध्ये वर पोहे ठेऊन करत होते सुगंधित तंबाखूची तस्करी

819

– वाहनासह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.२१ : छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात पोहा मुरमुराच्या पोत्याच्या खाली सुगंधित तंबाखू दाबून अवैधरित्या वाहतूक करतांना कुरखेडा पोलिसांनी वाहनासह २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई १९ जानेवारी रोजी रात्रोच्या सुमारास केली. याप्रकरणी ट्रकचालक ललितकुमार खेमचंद टंडण (२५) रा.राजनांदगाव, छत्तीसगढ याला अटक करण्यात आली आहे.
छत्तीसगड राज्यातून सीजी ०८ एके ४२३८ क्रमांकाच्या टेम्पोतून गडचिरोली मार्गे चंद्रपूर ला सुगंधित तंबाखूची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती कुरखेडा पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून गोठणगाव नाक्यावर सदर क्रमांकाचा टेम्पो आल्यावर झडती घेतली असता त्यात वर पोह्याचे पोटे व त्याखाली सुगंधित तंबाखू आढळून आला. तस्करीच्या या शक्कलीने पोलीसही चक्रावले. सुमारे ८ लाख ९ हजार २८० रुपयांचा तंबाखू, ३ लाख ८५ हजारांचे पोहे, मोबाईल, टेम्पो असा सुमारे २३ लाख ५० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले असू शकते पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here