The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : महाराष्ट्रातील दुर्गम गडचिरोली जिल्ह्यात काल काँग्रेसची विभागीय आढावा बैठक शनिवार २० जानेवारी रोजी गडचिरोली येथे घेण्यात आली. या बैठकित काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, सुनील केदार, अनिस अहमद, मारोतराव कोवासेसह अनेक ज्येष्ठ नेत्यांचे काँग्रेसचे नेते माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सदर बैठक महाराजा सेलिब्रेशन हॉल ॲण्ड लॉन, धानोरा रोड गडचिरोली येथे पार पडले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काय-काय तयारी केली याचा आढावा घेण्यासाठी गडचिरोलीत शनिवार २० रोजी जानेवारी रोजी विभागीय बैठकीचे आयोजन केले होते. लोकसभा निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर बुथस्तरावरील यंत्रणा सक्षम करा असा सल्ला यावेळी काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून दिला.
यावेळी माजी आमदार नामदेवराव उसेंडी, आदिवासी काँग्रेस सेलचे जि.अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी, माजी जि.प. सदस्य रामभाऊ मेश्राम, काँग्रेस प्रदेश सदस्य पंकज गुडेवार, आविसंचे जेष्ठ नेते शंकर मंदा, नेते मल्लिकार्जुन आकुला, सचिव युवक काँग्रेस विश्वजीत कोवासे, अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जावजी, सरपंच अजय आत्राम, भामरागडचे माजी सभापती सुखराम मडावी, उपसभापती गिताताई चालुरकर, भामरागडचे काँग्रेस तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी, सुधाकर तिम्मा,चिंनु सडमेक, प्रभाकर मडावी, जुरू पुंगाटी, प्रशांत गोडसेलवार, कार्तिक तोगम, सप्नील मडावी, प्रमोद गोडसेलवार, सचिन पंचार्य, लक्ष्मण बोल्लेसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.