गडचिरोली पोलिस दलात मोठे फेरबदल ; ७२ अधिकाऱ्यांच्या बदल्या

21

गडचिरोली पोलिस दलात मोठे फेरबदल ; ७२ अधिकाऱ्यांच्या बदल्या
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून, पोलिस अधीक्षक यांनी ५ ऑगस्ट रोजी तब्बल ७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या बहुतांश ठाणेदारांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आल्याने जिल्हा पोलिस दलात नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप झाले आहे.
या बदल्यांमध्ये पोलिस निरीक्षक कैलास गवते यांची आरमोरी येथून धानोरा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. उपअधीक्षक (मुख्यालय) स्वप्निल इज्जपवार यांची देसाईगंज येथे, तर अजय जगताप यांची देसाईगंज येथून कुरखेडा येथे बदली झाली आहे. महेंद्र वाघ यांची कुरखेडावरून आष्टी येथे, दीपक डोंब यांची चामोर्शीहून कोरची येथे, नियंत्रण कक्षातील महादेव ढाकणे यांची चामोर्शी येथे, तर सुनील बागल यांची मुलचेरा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय इंटरसेल गडचिरोलीचे बाबासाहेब दुधाळ यांची सिरोंचा येथे, तर इंटरसेल अहेरीचे सचिन झनक यांची आरमोरी येथे बदली करण्यात आली आहे. या व्यापक फेरबदलामुळे विविध पोलिस ठाण्यांच्या कामकाजात नवे नेतृत्व मिळणार असून, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

गडचिरोली, एटापल्ली आणि अहेरीच्या ठाणेदारांवर कायम विश्वास

दरम्यान, जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे नियंत्रण, प्रतिबंधात्मक कारवाया आणि तपासातील प्रभावी कामगिरीची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच एटापल्ली आणि अहेरी येथील ठाणेदारांनाही त्यांच्या विद्यमान पदावर कायम ठेवण्यात आले आहे. या प्रशासकीय फेरबदलानंतर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेच्या कामकाजात अधिक गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here