कुरखेडा : घाटी येथे गाव गणराज्य शिलालेख १९ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

145

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.१२ : तालुक्यातील घाटी येथे शुक्रवार १२ जानेवारी रोजी गाव गणराज्य शिलालेख १९ वा वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम सोहळा संपन्न झाला यावेळी सकाळी ७ वाजता ग्रामसफाई करण्यात आली त्यानंतर गावातून राष्ट्र‌संत तुकडोजी महाराजाची पालखी काढण्यात आली. त्यानंतर शिलालेखाचे विधिवत पुजन सरपंचा सौ. मोहिनीताई गायकवाड, गाव गणराज्य अध्यक्ष पितांबरजी ठलाल, सचिव मनीन लाडे, उपसरपंच फाल्गुन कुठे, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष रुपचंद दवणे, सचिव देवराव ठालाल, नथ्थुजी दखणे महाराज, लक्ष्मणजी बावणे महाराज, देवरावजी मेश्राम यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी १२.०० वाजता भजन व किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. दुपारी १.०० वाजतापासून प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पितांबर ठलाल व प्रमुख मार्गदर्शक आमदार कृष्णाजी गजबे, कुरखेडाचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार नाशिरभाऊ हाशमी, श्री देवेगुरु आत्मानुसंधान अड्याळ टेकडी उपस्थित होते.मार्गदर्शन करताना आमदार गजबे यांनी ‘गाव करी ते काय करी’ या प्रमाणे गावच्या ग्रामसभेचे महत्व, आमसभेचे अधिकार, आपला गाव आपले राज्य, माता जिजाऊचे विचार, स्वामी विवेकानंदाचे कार्य खुप सुंदर व चांगल्या प्रकारे समजावून सांगीतले त्याच प्रमाणे नाशिर हाशमी यांनी जल, जंगल, जमीनीचे अधिकार, जाती धर्मामधील भेदभाव, ग्रामसभेचे अधिकार भाणि हक्क, ग्रामगीता याविषयी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. उपसरपंच फाल्गुन फुले यांनी घाटी ग्रामसभेचे अधिकार, ग्रामसभेच्या परवानगीशिवाय कोणताच विभाग काम करु शकत नाही व गावचा विकास करायचा असेल तर कोणताही पक्ष न पाहता चांगल्या व्यक्तीची निवड करायला पाहिजे असे मार्गदर्शन केले.
भारतीय संविधान कलम 47 व 73 व्या घटना दुरुस्ती नुसार अनुसुचित क्षेत्रासाठी 24/12/1996 नुसार श्रामसभेस मिळालेले अधिकार व वनहक्क कायदा 2006, 2008, 2012 नुसार मिळालेले अधिकार याचा पुरेपुर उपयोग घाटी ग्रामसभा करीत आहे.
सदर कार्यक्रमाल संपूर्ण गावकरी, महिला, अधिकारी, कर्मचारी, सर्व समित्यांचे सदस्य उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालक दुलारामजी नाकाडे, तंमुसअध्यक्ष यांनी केले तर आभार सुरेजजी टेकाम पो. पा. घाटी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here