कुरखेडा : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ३७५ प्रकरणे मंजुर

252

The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ः कुरखेडाचे तहसीलदार ओमकार पवार यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनात कुरखेडा तालुक्यात डिसेंबर 2023 मध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत संभाव्य लाभार्थी विशेष शोध मोहिम राबविण्यात आली होती. त्यानुसार तहसिल कार्यालय, कुरखेडा येथे 29 डिसेंबर 2023 रोजी तहसीलदार ओमकार पवार यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्राप्त झालेल्या संजय गांधी निराधार योजने अंतर्गत एकूण 383 प्रकरणात, 375 मंजुर, 08 नामंजुर करण्यात आले.
त्यापैकी, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत एकुण 100 प्रकरणात 98 प्रकरण मंजुर व 02 प्रकरणे नामंजुर तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गत एकूण 110 प्रकरणात 105 मंजुर 05 नामंजुर तसेच इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत एकूण 107 प्रकरणात 106 मंजुर 01 नामंजुर तसेच इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एकूण 66 प्रकरणात 66 मंजुर 00 नामंजुर ची कार्यवाही करण्यात आली.
बैठकीत समिती शासकीय अध्यक्ष तहसीलदार ओमकार पवार, समिती शासकीय सदस्य धिरज पाटील, संवर्ग विकास अधिकारी, पं.स. कुरखेडा, व पंकज गावंडे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, कुरखेडा तसेच समिती शासकीय सदस्य सचिव सत्यनारायण अनमदवार, नायब तहसिलदार, (संगायो) तद्वतच, अरुण गेडाम, अव्वल कारकुन, जगदेव नारदेलवार, अव्वल कारकुन, उमाकांत चतुर, महसुल सहाय्यक व प्रफुल सुरनकर, आय.टी. असिस्टंट हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here