– पत्रकार परिषदेतुन माहिती
The गडविश्व
गडचिरोली, दि.१२ : येत्या १४ जानेवारी रोजी संकल्प महाविजय – २०२४ महायुतीच्या प्रदेश नेतृत्वाच्या सुचनेनुसार व प्रदेश स्तरावरील ठरल्याप्रमाणे गडचिरोली येथे महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन धानोरा मार्गावरील महाराजा सेलिब्रेशन लॉन येथे दुपारी १२ वाजता आयोजीत करण्यात आल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी महायुती मधील सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील सर्वच जिल्ह्यात १४ जानेवारी ला एकाचवेळी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान येत्या लोकसभा निवडणुकीत १२ मित्र पक्षाला सोबत घेऊन ४५ पेक्षा अधिक खासदार निवडून आणू अशी घोषणाही यावेळी महायुती च्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. तर या मेळाव्याला जिल्हाभरातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी पत्रकार परिषदेला खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, शिवसेना संपर्क प्रमुख हेमंत जंम्बेवार, आर.पी.आय.गटाचे मुनिश्वर बोरकर, आर.पी.आय (आठवले) गटाचे घुटके, किसान आघाडी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजपा महिला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा कमेटीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, अमीताताई मडावी, निताताई वडेट्टीवार, भानारकर उपस्थित होते.