– समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निवेदनातून इशारा
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०३ : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली जिल्हा शाखा कुरखेडाच्या वतीने आज ३ जुलै रोजी निवेदन देण्यात आले.
येथील प्रशिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना स्टायफंड मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून बाहेर क्षेत्रात काम करावे लागत आहे त्यामुळे ते शिक्षण क्षेत्रात मागे पडत आहेत. वस्तीगृहामध्ये पाण्याची योग्य सोय नाही , आंघोळीच्या पाण्याची, राहण्याची योग्य सोय नाही, वस्तीगृहाला वॉर्डन नाही, वसतीगृहाच्या पूर्ण खिडक्या फुटून आहेत. तसेच पूर्ण वस्तीगृह घाण झालेला आहे व वस्तीगृहाचे बेसिग, नळ, पाण्याची टाकी, शौचालय आणि बाथरूम बरोबर नाहीत अश्या अनेक समस्या असून याकडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुरखेडा निष्काळजीपणाचे काम करत आहे . त्यामुळ येत्या १० दिवसात संपूर्ण समस्या सोडवून न दिल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन करणार आहेत असे निवेदन देण्यात आले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #abvp)