– पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे यापूर्वीच आवाहन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) दि. ०४ : येथील कोरची मार्गावर असलेल्या सती नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. सदर काम सुरू असतांना या मार्गावरील वाहतुक नदीमधून तात्पुरत्या स्वरूपात बाधंण्याता आलेल्या वळण मार्गावरून करण्यात आले होते. मात्र सदर वळती मार्ग हा नदीमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहाने आता खचला आहे. सदर मार्गाची वाहतुक इतर मार्गाने वळती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी २२ जून रोजी पारित केले होते.
राष्ट्रीय महामार्ग क्र.५४३ वरील कुरखेडा-कोरची मार्गावरील सती नदीवरील जुना पूल पाडून नव्या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर मार्गावर वाहतुक सुरळीत असावी यासाठी नदीमधून रपटा तयार करून वाहतुक सुरू होती. मात्र सदर नवीन पुलाचे बांधकाम वेळेत पुर्ण होऊ न शकल्याने व सदर तयार करण्यात आलेला रपटा हा पुराच्या पाण्याने वाहुन जाण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी संजय दैने यांनी २२ जून रोजी आदेश निर्गमित केले होते. सदर मार्गावरील वाहतुक २९ जून पासून बंद करून इतर पर्यायी मार्गाने वळती करण्याचे सांगितले होते. दरम्यान सदर रपटा हा नदीमधील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहाने ४ जुलै रोजी काही प्रमाणात खचला आहे. सदर मार्गावरून पुर्णतः वाहतुक आता बंद पडली असुन पर्यायी मार्गाचा वापर करून तालुकास्थळ नागरिकांना गाठावे लागणार आहे.

‘असा’ असेल पर्यायी मार्ग
- हलक्या स्वरुपाची वाहनांकरिता कुरखेडा- चिचटोला फाटा- आंधळी-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या रस्त्याचा
- जड वाहतुकीकरिता कुरखेडा-वडसा-आरमोरी-वैरागड मार्ग (रा.म. क्र. ३६३)- गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
https://x.com/gadvishva/status/1808751057763213766?s=19
(#thegdv #gadchirolipolice #gadchirolipolice #kurkheda )