कुरखेडा : कुंभिटोला घाटावरून अवैध रेती वाहतुक, प्रशासनाचा कानाडोळा

645

– कारवाई करण्याची गावकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, २८ फेब्रुवारी : शासनाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा घटक म्हणून गौण खनिजाकडे बघितल्या जाते. नदी नाल्यातील रेती हे घटक त्या पैकी एक आहे. कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला घाटावरून अवैधरित्या रेती उपसा करून वाहतुक करत असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या महसुलाचे हरण केले जात आहे. या प्रकरणी अवैध व्यवसायावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री यांना निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, महसूल विभागामार्फत देण्यात आलेल्या रेती उपसा करण्याच्या परवानाच्या नियमांना धाब्यावर बसवत रेती वाहतूक या घाटातून केली जात आहे. ज्या ठिकाणावरून रेती उपसा करण्याचा सातबारावर परवाना सदर रेती मालकाला मिळालेला आहे तिथून उपसा न करता इतरत्र ठिकाणावरून उपसा होत आहे, उपसा होत असलेली जमीन तुकाराम कांडे पोरेटी यांच्या नावे असून ज्या सातबारावर रेती उपसा करण्याचा परवाना दिला आहे त्याचे यापूर्वीच ईपिक पाहणी केली असून उत्पन्नही दाखवले व धान विक्री केली आहे तर मग २०२१ पासून २०२३ पर्यंत रेती उपसा करण्याचा परवाना कसा मिळाला ? हा संशोधनाचा विषय असून रेतीचा उपसा हा दिलेल्या वेळेनुसार होत नाही. याबाबत तहसीलदार यांच्याकडे माहिती दिली असता संबंधित प्रकाराकडे कानाडोळा करण्यात येत आहे. एकंदरीत सर्व प्रकार हा अवैध असल्याचे निष्पन्न होत असून सदर प्रकरणाची लवकरात लवकर उचित चौकशी करून प्रकरणातील संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी व गावकऱ्यांना योग्य न्याय देण्यात यावा तसे न झाल्यास गावकऱ्यांमार्फत संबंधितांवर कारवाई केली जाईल व होणाऱ्या कारवाई करीता सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असे म्हटले आहे.
सदर प्रकरण गंभीर असून याप्रकरणी अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Kurkehda) (Kumbhitola) (The Gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here