The गडविश्व
गडचिरोली, २८ फेब्रुवारी : जिल्हा परिषद उच्च प्राथ. केंद्र शाळा आंबेशिवणी येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्त आज २८ फेब्रुवारी ला भारतरत्न सि. व्ही. रमण यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विज्ञान प्रदर्शनी व बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी या दृष्टीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच शाळेमध्ये छोटे वैज्ञानिक विद्यार्थ्यांनी स्व कल्पनेतून मॉडेल, साहित्य बनवून आणले व बाल आनंद मेळावा अंतर्गत विविध खाद्यपदार्थ बनवून त्याची विक्री सुद्धा केली. तसेच विज्ञान आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. सदर उपक्रमात शाळा व्य. स. अध्यक्ष हरिदास म्हस्के, उपाध्यक्ष सौ.रिनाताई सहारे, उपसरपंच योगाजी कुडवे, प्रतिभा झंजाळ, विलास झंजाळ, श्रीकांत झंजाळ, राकेश झंजाळ, बारशिंगे सर (के. प्र. ), बांबोळकर (मु. अ ), सागर आत्राम (वि शिक्षक ), पुंडगे, सौ. मिना पुण्यपवार इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर बक्षीस वितरण अध्यक्षांच्या च्या हस्ते करण्यात आले.
