– कुंभिटोला येथील वीटभट्टी प्रकरण तापणार The गडविश्व कुरखेडा, २ मार्च : भारतीय संस्कृतीत बाळाचा जन्म झाल्यानंतर १२ दिवसानंतर बारसे (नामकरण ) केले जाते. असाच प्रकार कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथे ‘आधी बाळंतपण नंतर बारस्याचे निमंत्रण’ असा महसूल विभागाचा अजब कारभार माती उत्खनन प्रकरणी लावण्यात आलेल्या जाहीरनाम्यातून दिसून येत असून चर्चेचा विषय ठरलेला आहे.
कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथे मागील एक महिन्यापासून वीटभट्टी अगदी गावालगत सुरु आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वीट तयार करण्याकरिता माती हा महत्वाचा घटक मानल्या जातो. याकरिता महसूल विभागाकडून रीतसर परवाना दिला जातो मात्र कुंभिटोला येथे कोणताही परवाना नसताना व कोणताही जाहीरनामा महसूल विभागामार्फत न काढता सर्रासपणे महिनाभरापासून वीटभट्टी सुरु आहे. गावकऱ्यांचा सदर वीटभट्टी ला विरोध असून याबाबत १६ जानेवारी रोजीच तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून कारवाई करण्याची मागणी केली. मात्र १ महिन्याचा कालावधी लोटूनही अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत सखोल चर्चा करण्याचे ठरवले मात्र जिल्हाधिकारी यांची भेट झाली नाही. मात्र सदर माहिती वाऱ्यासारखी पसरताच मात्र महसूल विभाग जागे होत सावरासावर करत १ मार्च रोजी सदर वीटभट्टी धारकाचा मागील दिनांकात ग्रामपंचायत कुंभिटोला येथे जाहीरनामा प्रकशित केला. त्यामुळे ‘आधी बाळंतपण नंतर बारस्याचे निमंत्रण’ असा महसूल विभागाचा अजब गजब कारभार आता चर्चेचा विषय ठरलेला आहे.
शासनाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा घटक म्हणून गौणखनिजाकडे बघितले जाते. मात्र या गौणखनिजांची लूट अवैध व्यावसायिकांकडून होत असतांना मात्र महसूल विभाग तोंडावर रुमाल ठेवून बसल्यासारखा गप्प बसून असल्याचे दिसून येत आहे. सदर प्रकार महसूल विभागाच्या डोळ्यादेखत होत असतांना देखील याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत अवैधरित्या वीटभट्टी चालवणाऱ्यास अभय दिल्या जात असल्याचा आरोप गावकरी करीत आहे. त्यामुळे आता महसूल विभाग अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या दावणीला तर बांधले नाही ना असा देखील सूर गावकऱ्यातून उमटू लागला आहे.
१ मार्च रोजी लावण्यात आलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे कि, “कुंभिटोला येथील सर्वे नं. ८/४ एकूण क्षेत्र १.६२ पैकी आराजी ०.१० हे.आर मधून ३५ ब्रास माती उत्खनन करून वाहतूक करण्यास परवानगी मिळण्याकरिता नरेश हरिदास हरडे रा.कुंभिटोला ता.कुरखेडा यांनी अर्ज सादर केला. करिता या बाबत आक्षेप व हरकती असल्यास जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात सादर करावे.”
मात्र यात महसूल विभागाचा अजब गजब कारभार पुढे आला असून जाहीरनामा हा २० फेब्रुवारी या दिनांकाचा काढलेला आहे व वीटभट्टी ही एका महिन्यापूर्वीच सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सदर जाहिरनामा हा आक्षेप नोंदविण्याचे दिवस झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये १ मार्च २०२३ ला लावण्यात आल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे असून एकूणच सदर प्रकरण हे अलगट येणार असल्याचे पाहून महसूल विभागाने सावरासावर करत हा जाहीरनामा ग्रामपंचायत मध्ये लावलेला आहे असेही गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.
सदर प्रकरणाबाबत खोलवर चौकशी झाल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असून ‘आधी बाळंतपण नंतर बारस्याचे निमंत्रण’ हा महसूल विभागाचा अजब गजब कारभार मात्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. सदर प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर प्रकरणाबाबत तलाठी कुकडे यांना विचारणा करण्याकरिता फोनद्वारे संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
तर कुंभिटोला येथील सरपंचा हलामी यांना ग्रामपंचायत मध्ये लावण्यात आलेल्या जाहीरनामाबद्दल विचारणा केली असता ‘अद्यापपर्यंत हा जाहीरनामा ग्रामपंचायत येथे लागलेला नव्हता व माझ्या निदर्शनास आलेला नव्हता १ मार्च रोजी हा जाहीरनामा लावण्यात आला अशी माहिती खुद गावकर्यांकडून मला प्राप्त झाली व व्हाट्सएपच्या माध्यमातून तो जाहीरनामा बघितला आहे असे सांगितले.
१ मार्च रोजी ग्रामपंचायत मध्ये लावण्यात आलेला जाहीरनामा
(The Gaevishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Kurkheda) (Kumbhitola Vitbhatti)
- ५० वर्षांपासून वनहक्कासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याची पत्रकार परिषदेत व्यथा
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २९ : धानोरा तालुक्यातील तुकुम येथील शेतकरी बळीराम आत्माराम मोटघरे...