कोरची : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी जेरबंद

56

कोरची : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी जेरबंद
The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि. १२ : लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना कोरची तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २५ वर्षीय नराधम आरोपी अजय टिल्लू कल्लो याला अटक केली आहे.
आरोपीने पीडितेचा विश्वास संपादन करून मागील वर्षभरापासून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. यामुळे पीडिता ३ महिन्यांची गर्भवती राहिली असून, वैद्यकीय अहवालात याला दुजोरा मिळाला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून कोरची पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here